Cash Along With Jewelery Was Sent From Biba Nagar During The Day उघडे घर चोरट्यांसाठी ठरली संधी : 43 हजारांच्या ऐवजावर डल्ला
जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्या वाढल्या असतानाच चोरट्यांनी आता पहाटे घराचे दोन्ही दरवाजे उघडे ठेवून झोपलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी रोकडसह 43 हजारांचा ऐवज लांबवला. शनिवार, 20 ऑगस्ट रोजी पहाटे 1 ते साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
बिबानगर येथे प्रमिला सुधाकर चौधरी (56) या वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी घराचा मागच्या खोलीचा रुमचा लोखंडी व लाकडी दरवाजे उघडा ठेवून प्रमिला चौधरी या झोपल्या असताना पहाटे एक ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरट्याने घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधत घरातील 11 ग्रॅमचा सोन्याचा हार, तीन ग्रॅमचे कानातले, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, तीन ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, 10 ग्रॅमचा चांदीचा शिक्का, 100 ग्रॅमच्या चांदीच्या पायातल्या साकळ्या व 600 रुपये रोख असा एकूण 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सकाळी उठल्यानंतर प्रकार लक्षात आल्यानंतर प्रमिला चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत.

