जळगावात युवकाचा खून : पसार आरोपी जाळ्यात


Murder of a youth in Jalgaon: The accused is in jail जळगाव : शहरातील शिव कॉलनी परीसरात रविवारी सायंकाळी मोबाईल खराब केल्याच्या वादातून अक्षय अजय चव्हाण (23, रा.पिंप्राळा) या युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत पसार झाले तर त्यातील निलेश प्रवीण पवार या आरोपी जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
निलेश प्रवीण पवार (रींग रोड, जळगाव) हा शिरसोली येथे लपून बसला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. दरम्यान, रविवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शिवकॉलनी परीसरात मोबाईल खराब केल्याच्या वादातून अक्षय अजय चव्हाण (23, रा.पिंप्राळा) या युवकाची हत्या करण्यात आली होती.



यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे, इमरान सय्यद, किशोर पाटील, राकेश बच्छाव, मुदस्सर काझी, सुधीर साळवे, सचिन पाटील तसेच जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, जुबेर तडवी, अमित मराठे आदींनी आरोपीला या कारवाईत सहभाग घेतला. या पथकाने शिरसोली येथील जंगलात लपून बसलेल्या निलेश पवार यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपासकामी अटकेतील निलेश पवार यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !