सख्खा भाऊ पक्का वैरी : बेटावद खुर्दला प्रॉपटी वादातून हत्या
मोठ्या भावानेच लहान भावाला हात-पाय बांधून विहिरीत फेकल्याचा आरोप
जामनेर : ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ असल्याची घटना तालुक्यातील बेटावद खुर्द येथे घडली. शेतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची बुधवारी हत्या केली. धनराज प्रताप राजपूत (मचे) असे मृताचे नाव असून या प्रकरणी बेटावद खुर्द येथील रणजित प्रताप राजपूत (मचे) यास अटक करण्यात आली.
शेती वादातून हत्या केल्याचे उघड
राजपूत बंधू आपल्या कुटुंबासह गावात राहतात. सोमवारपासून मयत धनराज (38) हा बेपत्ता होता. त्यानंतर बुधवारी त्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह बेटावद बुद्रुक शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. मयताची पत्नी मनीषा राजपूत यांच्या फिर्यादीवरून मयताचा मोठा भाऊ रणजीत याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होते. मयत धनराजच्या पश्चात आई पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परीवार आहे.



