हावडा मेलला आता एलएचबी कोचेस


भुसावळ : हावडा मेल व्हाया छियोंकीला आता एलएचबी कोचेस जोडण्यात येणार असल्याने रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. 12322 डाऊन मुंबई-हावडा मेल व्हाया छियोंकी 12 डिसेंबरपासून एलएचबी कोसेस लावण्यात येणार आहेत तर अप 12321 हावडा मुंबई मेल व्हाया छियोंकी हावडा येथून 10 डिसेंबरपासून एलएचबी कोचेस घेवून धावणार आहे. एकूण 22 कोसेस या गाडीला जोडण्यात येणार असून त्यात 10 स्लीपर, एक प्रथम वातानुकूलितसह द्वितीय वातानुकूलित श्रेणी, एक द्वितीय वातानुकूलित श्रेणी, चार तृतीय वातानुकूलित श्रेणी, तीन सामान्य द्वितीय श्रेणी, एक भोजनयान तथा दोन जनरेटर कोचेस जोडण्यात येतील.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !