पालघर-अमळनेर बसला अपघात


Palghar Bus Accident 5 Between Manor-Vikramgad : Passenger Injured पालघर  : पालघर आगारातून अमळनेरच्या दिशेने निघालेल्या बसला समोरून आलेल्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवास जखमी झाले.

समोरा-समोर धडक
गुरुवारी सकाळच्या सुमारास पालघरहून अमळनेरकडे बस येत असताना समोरून आलेला टेम्पो धडकला. त्यात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही बस नाशिक, धुळे मार्गे अमळनेर येणार होती. या अपघातात बस चालकासह पाच प्रवासी जखमी झाले.



या जखमी प्रवाशांचा समावेश
अपघातग्रस्त एस.टी. बसमध्ये विक्रमगडहून जव्हारच्या दिशेने जाणारे 30 प्रवासी होते. अपघातात जखमींमध्ये दयानंद (54), कैमूद्दीन शेख (31), धिरेंद्र यादव (32), राधेश्याम तिवारी (38), रवींद्र यादव (40) आणि एस.टी. बसचालक तवाब खान (32) यांचा समावेश आहे.

अनेकांचा चुकला काळजाचा ठोका
जुलै महिन्यात इंदोरकडून अमळनेरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीत कोसळल्याने या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !