20 हजारांची लाच भोवली : आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
20,000 bribe : The chief administrative officer in the office of the deputy director of the health department in the ACB’s net
नाशिक : नाशिकच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारीर्यास 20 हजाराची लाच मागणे चांगलेच अडचणीचे ठरले आहे. लाच स्वीकारताच नाशिक एसीबीने या धिकार्याला अटक केली. गजानन मारोतराव लांजेवार असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.
लाच स्वीकारताच केली अटक
लांजेराव हे नाशिकच्या उपसंचालक आरोग्य सेवा या ठिकाणी कार्यरत असून त्यांनी तक्रारदार यांचे सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र तक्रारदारान एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला.


कार्यलयातच केली अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या एका मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत बुधवारी उपसंचालक कार्यालयात हा सापळा लावण्यात आला. एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागातून धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या अधिकार्याने उपसंचालक कार्यालयात त्याच्या कार्यकाळातील रजेच्या रोखीकरणाचे बिल मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करूनही मुख्य प्रशासकीय अधिकारी लांजेवार यांच्याकडून बिल मंजुरीसाठी टाळाटाळ केली जात होती.
सेवानिवृत्त अधिकार्याच्या तक्रारीनंतर कारवाई
लांजेवार यांनी या कामाच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार सेवानिवृत्त अधिकार्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार बुधवारी पथकाने संदर्भ रुग्णालयात सापळा रचला असता नियोजनानुसार दुपारी लांजेवार यांच्या दालनातच त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे

