स्वस्तातला मोबाईल पडला जळगावातील तरुणाला 12 लाखांना


A young man from Jalgaon got a cheap mobile phone for 12 lakhs जळगाव :  स्वस्तातला मोबाईल घेण्याची हौस जळगावातील तरुणाला 12 लाखांना पडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओळखीच्या भामट्याने घातला गंडा
जळगाव शहरातील प्रथमेश विनायक राणे (18, गणेश कॉलनी, ख्वॉजामिया दर्ग्याजवळ, जळगाव) हा तरुण राहतो. सध्या तो शिक्षण घेत असून त्याची ओळख पुण्यातील बानेर येथील दीपक प्रभू याच्याशी झाली. तुला कमी किंमतीत मोबाईल आणून देतो, असे सांगून त्याच्याकडून 11 लाख 75 हजार रुपये घेतले. दीपकने मोबाईल दिले नाही म्हणून त्याच्याकडे पैसे मागितले असता त्याने प्रथमेशला धमकी देत तुझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रथमेश राणे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !