जळगावकरांना दिलासा : सीटी बस विद्यापीठापर्यंत धावणार


Relief for Jalgaon residents: CT bus will run to the university जळगाव : जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जुन्या बस स्थानकापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बससेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता व त्यास यश आले असून सीटी बस सुरू करण्याचे निर्देश विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिले आहेत.

बससेवा बंदने होत होते हाल
आधी जुन्या बस स्थानकापासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बस धावत होते मात्र ही बससेवा बंद करण्यात आली असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आणि विशेष करून विद्यार्थिनींची कुचंबणा होत होती. त्यांना पूर्णपणे खासगी रीक्षा वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत होते.

पाठपुराव्याला आले यश
या पार्श्‍वभूमीवर जुने स्थानक ते विद्यापीठ कँपस यांच्यात पुन्हा सीटी बससेवा सुरू करावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा केला. त्याला आता यश आले असून लवकरच ही बस सेवा सुरू होणार आहे. या संदर्भात एस.टी.चे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !