जळगाव कारागृहात बंदीवानांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी : चौकडीविरोधात गुन्हा


In Jalgaon Jail, inmates riot because of not being given double breakfast जळगाव : डबल नास्ता न मिळाल्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना जळगावातील कारागृहात शुक्रवारी सकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी चौघा कैद्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारागृहात नास्ता डबल न दिल्यावरून हाणामारी
कारागृहातील कैद्यांना करण पवार हा नाश्ता वाटप करीत असताना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबारच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सतीश मिलिंद गायकवाड याला करणने डबल नाश्ता न दिल्याने त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यानंतर सतीश गायकवाड हा बंदी मुलाखत विभागाकडून त्याच्या बॅरेककडे जात असताना कॉरंटाईन विभागाच्या बॅरेकसमोर जात असतांना करण युवराज पवार व त्याच्यासोबत असलेले विलास चंद्रसिंग पठाण, अर्जुन युवराज पवार हे याठिकाणी आले. त्यांनी सतीश गायकवाड सोबत हुज्जत घालून त्याला शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हाणामारीत दोघे जखमी
कारागृहात हाणामारी सुरू असल्याचे कळताच तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पोलिस शिपाई गजानन चव्हाण यांच्यासह इतर बंद्यांनी मिळून त्यांचे भांडण सोडाविले. या घटनेत करण पवार याच्या डाव्या पायाला व हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे तर सतीश गायकवाड याच्या तोंडाला मुक्का मार लागला. या प्रकरणी चौघांविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !