Yawal city murders and shocks: Woman killed in village with ax यावल शहर खुनाने हादरले : कुऱ्हाडीचे गाव घालत महिलेची हत्या

Yaval city murders and shocks: Woman killed in village with ax


Yawal city murders and shocks: Woman killed in village with ax यावल : यावल तालुक्यातील चितोडा येथील ३५ वर्षीय तरूणाच्या खून प्रकरणास पाच दिवस उलटत नाही तोच शहरातील काजीपुरा वस्तीत एका 38 वर्षीय महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घूण हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास शहरातील काजीपुरा वस्तीत घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपी विरोधात यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहर खुनाने हादरले
पाच दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील ३५ वर्षीय तरूणाचा खून झाला होता. या खून प्रकरणी पोलीस व्यस्त असतानाच शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेचे सुमारास येथील काजीपुरा वस्तीतील , नाजीया खलील काजी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्‍हाडीने हल्ला करण्यात आला. तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातून संशयित आरोपी जावेद युनूस पटेल (रा. काजीवाडा) याने महिलेच्या डोक्यात कुराडीचे सपासप वार केल्याने महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळतात यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अत्त्यवस्थ अवस्थेतील महिलेस रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रस्त्यात महिलेची प्राणज्योत मालवली. महिलेच्या खुनाची माहिती मिळतात यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावल शहरात महिलेची हत्या झाल्याची बातमी कळतात मोठी खळबळ उडाली. यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे. महिलेचा खून केल्याप्रकरणी यावल पोलिसांनी जावेद युनूस पटेल (रा. काजीपुरा) या संशयिताला अटक केली आहे आरोपी विरोधात मयत महिलेचे पती खालील काळजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !