जामुनझिरा येथील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू


यावल : तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावरील एका 18 वर्षीय तरुणीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. अत्यवस्थ अवस्थेत तरुणीला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिता शिवलाल बारेला (18) असे मयत तरुणीचे नाव आहे.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जामुनझिरा, ता.यावल या आदिवासी पाड्यावरील रहिवासी अनिता शिवलाल बारेला (18) ही तरुणी गेल्या काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती व तिची प्रकृती अचानक बिघडली होती. तिला यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. जळगावात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !