मुख्याधिकार्यांच्या खड्डे बुजवण्याच्या आदेशाची ठेकेदाराकडून पायमल्ली
रावेर : शहरातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर ठेकेदार दिरंगाई करीत असल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आदेशाला ठेकेदाराकडून हरताळ
पावसाळा सुरू असल्याने पाण्यामुळे नगरपालिकेत अंतर्गत येणार्या रस्त्यावरील खड्ड्यात अधिक वाढ झाली आहे. तोंडावर गणेशोत्सव आहे. या बाबतची तक्रार पालिका मुख्यधिकारी स्वालिहा मालगावे यांच्याकडे केली असता त्यांनी पालिका हद्दीतील खड्डे बुजवण्याचा वार्षिक ठेका घेतलेल्या गजरे नामक ठेकेदाराल खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आदेश देऊन आठ ते दहा दिवस उलटले परंतु ठेकेदारोन आदेश अद्यापही गांभीर्याने न घेता खड्डे बुजवले नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत.

