तामसवाडीत गळफास घेवून एकाची आत्महत्या


रावेर : तालुक्यातील तामसवाडी येथे 26 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तालुक्यातील तामसवाडी येथील शैलेंद्र मुरलिधर मिस्तरी (26) याने गुरुवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या अँगला केबल वायर अडकवून गळफास घेत आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी तरुणाची फारकत झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातुन त्याने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे. याबाबत बंडू प्रभाकर महाजन यांनी खबर दिल्याने रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारेकर व सहकारी पुढील तपास करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !