गणरायाच्या चरणी हारफुलांऐवजी ‘एक वही, एक पेन’ अर्पण करा

भुसावळातील मयूर अंजाळेकर यांची मागणी : एक वही, एक पेन अभियानाच्या वतीने आवाहन


भुसावळ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी गणेशोत्सव काळात बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या चरणी हार-फुले न वाहता ‘एक पेन-एक वही’ शैक्षणिक वस्तू अर्पण करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवकचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयुर अंजाळेकर यांनी केले आहे.

एक हात मदतीचा देण्याचे आवाहन
राज्यभरात गणेशोत्सव धूम-धडाक्यात साजरा होतो. सर्व भाविकांनी हार-फुलामागे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो व दुसर्‍या दिवशी तेच निर्माल्य म्हणून फेकण्यात येते. यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा द्यावा यात समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील पालकांची अधिकच कुचुंबणा होत असून अशा सर्वांना मदतीचा हात म्हणून घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सववात जमा झालेल्या सर्व शैक्षणिक वस्तूंचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहेत. जमा झालेल्या शैक्षणिक वस्तू वाटप करण्यासाठी 9503900740 या क्रमांकावर संपर्क साधावा शिवाय यासाठी शाळा तसेच महाविद्यालयांनी पुढे यावे, असे आवाहन मयूर अंजाळेकर यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !