गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात आयजीं पथकासह चोपडा पोलिसांची कारवाई


Action of Chopra police along with IG team to trap the accused along with Gavathi Kattya जळगाव : नशिराबाद गावातील युवराज कडू होंडाळे या संशयीतास गावठी कट्टा, चार काडतूसांसह अटक करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पथकाने 30 रोजी ही कारवाइ केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी पथकाने गोपनीय माहितीवरून कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा, चार काडतुस आणि दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपी युवराज होंडाळे यास अटक करण्यात आली आहे. संशयीतोन पार उमर्टी, ता. वरला जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश येथून गावठी विकत घेतल्याची माहिती असून ण 94 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीस चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.



यांनी केली कारवाई
ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, हवालदार राकेश पाटील, शिंगाणे, संजय येंदे तसेच आयजींच्या विशेष पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !