आडगावच्या विवाहितेचा विनयभंग : आरोपीला तीन वर्ष शिक्षा


यावल : तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेच्या घरात अनधिकृतपणे शिरून विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी यावल न्यायालयाने आरोपी गुलाब युवराज न्हावी यास तीन वर्षांची शिक्षा शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी सुनावली. 28 ऑगस्ट 2018 रोजी आरोपी गुलाब न्हावी हा अनधिकृतरीत्या विवाहितेच्या घरात शिरला व त्याने विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडीत महिलेने यावल पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे पीडीतेसह एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. ह्या खटल्याचे कामकाज न्या.डी.जी. जगताप यांच्या न्यायालयात चालले. न्यायालयाने आरोपी गुलाब न्हावी यास भादंवि कलम 354, 448 व 506 अन्वये दोषी ठरवत तीन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच कलम 448 अन्वये एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड, कलम 506 अन्वये एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंडाच्या रक्कमेतून दोन हजार रुपये पीडीत फिर्यादीस अपिल कालावधी नंतर देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे तर आरोपीतर्फे जगदीश कापडे यांनी काम पाहिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !