A six-year-old girl was molested in Pachora city पाचोरा शहरातील अल्पवयीन सहा वर्षीय बालिकेचा विनयभंग


A six-year-old girl was molested in Pachora city पाचोरा : शहरातील एका भागात सहा वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधम आरोपीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. ही धक्कादायक घटना बुधवार, 31 रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राहुल संतोष धनगर या आरोपीला रात्रीच अटक केली.

बालिका खेळण्यासाठी आल्यानंतर विनयभंग
पीडीत बालिका संशयीत आरोपीच्या घरी बुधवारी दुपारी मुलींसोबत खेळण्यासाठी आल्यानंतर नराधम आरोपीने अत्याचाराचा प्रयत्न करीत लज्जा निर्माण होइल, असे कृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरीकांनी पोलिस ठाणे गाठत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. रात्री उशिरा आरोपीविरोधात पोस्को, 376 अ व ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानतर त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !