फायनान्स कर्मचार्याला लुटणारे दोघे आरोपी जाळ्यात
मुक्ताईनगर पोलिसांनी दोन दिवसात लावला छडा : मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर : रीगाव-ज्ञसुळे रस्त्यावर खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यावर चाकू हल्ला करीत त्याच्या ताब्यातील 90 हजारांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली होती. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोधा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. युवराज गुलाब कचवेव सागर नवलसिंग वतपाळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चाकू हल्ला करीत लांबवली रक्कम
बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रीगाव-सुळे रस्त्यावर खाजगी फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यावर चाकू हल्ला करीत त्याच्याकडील 90 हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना घडली होती. दोघा तरुणांनी हा गुन्हा केला होता. सायंकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवल्यानंतर करणवाडी, ता.जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथील दोघा तरुणांचा या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. संशयीत आरोपी हे पूर्णाड, ता.मुक्ताईनगर येथील फाट्यावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता सापळा रचण्यात आला. पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीखक निलेश साळुंके, सहाय्यक फौजदार माधवराव पाटील, पोलिस नाईक सुरेश पवार, भगवान पाटील, अनिल सेनानी, मेजर संतोष कात्रे, संदीप खंडारे, संजय लाठे ,सुनील बडगुजर, पोलिस मित्र अरुण लोहार, रवींद्र जावळे आदींनी सापळा लावून संशशीत आरोपी युवराज गुलाब कचवे, सागर नवल सिंग वतपाळ यांना पकडले. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांना वढोदा पोलीस पाटील व सुळे पोलीस पाटील उमेश बाठे यांनी मोलाचे सहकार्य केले.



