Two died in different incidents in Bhusawal भुसावळात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू


Two died in different incidents in Bhusawal भुसावळ : शहरातील दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू ओढवला. पहिल्या घटनेत शहरातील शांती नगर भागातील पद्मावती अपार्टमेंटमधील रहिवासी अभिषेक संजय कुमार (29) हे घरी काहीएक हालचाल करीत नसल्याने बुधवार, 31 रोजी पहाटे ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय संजय पाटील करीत आहेत.

बाजारपेठेत हद्दीत अनोळखीचा मृत्यू
दुसर्‍या घटनेत शहरातील रेल्वे स्थानकाजवळ 30 ते 40 वर्षीय अनोळखी इसमाचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बुधवारी मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !