रावेरात वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने


रावेर : केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे महागाई गगनाला भिडल्याने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी रावेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.

पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा
इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर तसेच अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना सरकारचे झालेले दुर्लक्ष तसेच महाविकास आघाडीने घेतलेले लोकाभिमुख निर्णय रद्द करीत असल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके महागाई एकदम ओके अशा घोषणा देत आंदोलन केले.

यांचा आंदोलनात सहभाग
जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष मेहमूद शेख, जि.प.सदस्य दीपक पाटील, सचिन पाटील, महिला तालुकाध्यक्षा रेर्खा चौधरी, माया बारी आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !