पुणे आंतरराष्ट्रीय मँरेथॉन व नाशिक मँरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सचा यशस्वी सहभाग


भुसावळ : पुणे आंतरराष्ट्रीय मँरेथॉन व नाशिक मँरेथॉन मध्ये भुसावल रनर्सने यशस्वी सहभाग नोंदविला. पुणे मँरेथॉन ही देशातील सर्वात जुनी मँरेथॉन असून सलग 34 व्या वर्षी या मँरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रवीण फालक व प्रदीप सोलंकी या धावपटूँनी 42 किलोमीटरचे अंतर केवळ चार तास 51 मिनिटांत पूर्ण करून यश मिळवले. त्याचप्रमाणे नाशिक मॅरेथॉनमध्ये शीतल चोरडिया यांनी 21 किलोमीटर गटात सहभाग नोंदवून हे अंतर दोन तास 47 मिनिटांत पूर्ण केले. आठ दिवसांच्या आत लागोपाठ दोन अर्ध मँरेथॉन (21 किलोमीटर) पूर्ण करणार्‍या शीतल चोरडिया या भुसावळ शहरातील प्रथम धावपटू ठरल्यात. त्यामुळे भुसावळ रनर्समध्ये व विशेषत: महिला धावपटूंमध्ये विशेष उत्साह संचारला आहे शिवाय त्यांनी शहरातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे, असे उपाध्यक्षा डॉ. निलिमा नेहेते व महिला विभागप्रमुख डॉ. चारुलता पाटील यांनी सांगितले.

धावपटूंचा उत्साह वाढला
मुकेश चौधरी, सुनील फिरके, अजय आंबेकर, एस.आर.चौधरी, मुनसफ अली या धावपटूंनी 10 किलोमीटर स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. मुकेश चौधरी यांनी 10 किलोमीटर अंतर केवळ 59 मिनिटांत पूर्ण करून एक विक्रम निर्माण केला. यामुळे ब्रिजेश लाहोटी व गणसिंग पाटील यांनी मुकेश यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच सय्यद नदीम यांनी पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सहभाग नोंदवून नवीन धावपटूंचा उत्साह वाढविला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !