Ranjit Singh Rajput of Bhusawal appointed as Ambassador of Central Government’s ‘Fit India’ Campaign भुसावळचे रणजितसिंग राजपूत यांची केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाचे अ‍ॅम्बेसेडरपदी नियुक्ती


Ranjit Singh Rajput of Bhusawal appointed as Ambassador of Central Government’s ‘Fit India’ Campaign
भुसावळ :
केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबविल्या जाणार्‍या फिट इंडिया अभियान तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच आरोग्याविषयी जनजागृती होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भुसावळातील रणजीतसिंग राजपूत यांची ‘फिट इंडियाच्या अ‍ॅम्बेसेडरपदी’नियुक्ती करण्यात आली.

नुकतेच निवडीचे पत्र प्राप्त
केंद्र सरकारने फिट इंडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी फिट इंडिया व स्पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया (साई) च्या वतीने देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून काही तरुण व तरुणींची निवड केली आहे. रणजीतसिंग राजपूत यांना एकता विश्नोई भा.रा.से.(फिट इंडिया मिशन निदेशक, भारत सरकार) यांच्या वतीने फिट इंडिया अ‍ॅम्बेसेडरपदी म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

कार्याची केंद्र सरकारकडून दखल
रणजीतसिंग राजपूत यांनी युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीने राज्य निदेशक प्रकाश मनुरे व जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली फिट इंडिया अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रम घेऊन जिल्हा स्तरावर कार्य केले आहे. त्यात प्रामुख्याने भुसावळ शहरात आयोजित केलेला जिल्हास्तरीय ‘चेतक रण’ हा विशेष उल्लेखनीय ठरला तसेच भुसावळ शहरात ऑलम्पियन मनोज कुमार यांना बोलावून युवकांमध्ये फिटनेसच्या बाबतीत जनजागृती घडवून आणली. याच प्रकारे केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांची नियुक्ती फिट इंडिया अभियानासाठी केली आहे.

संधी मिळाल्याने केंद्राचे आभार : रणजीतसिंग राजपूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन फिट इंडिया मोहिमेची घोषणा केली. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरीकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही संकल्पना केंद्र सरकार मार्फत कार्यान्वित केली आहे. दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरीकांनी स्वतःला आरोग्य संपन्न ठेवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या राष्ट्रीय मोहिमेत कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे मी केंद्र सरकारचा आभारी असल्याचे राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी तथा फिट इंडियाचे अ‍ॅम्बसेडर रणजीतसिंग राजपूत म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !