Rajasthan’s Bharatpur Land Dispute Killing : Notorious gang Kagal in police net  राजस्थानच्या भरतपूरमध्ये जमीन वादातून हत्या : कुविख्यात टोळी कागल पोलिसांच्या जाळ्यात


Rajasthan’s Bharatpur Land Dispute Killing : Notorious gang Kagal in police net
कागल : 
कागल पोलिसांनी कुविख्यात टोळीतील पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींनी राजस्थान धील भरतपूरात जमीन वादातुन गोळ्या झाडून एकाचा खुन केला होता तर आरोपी महाराष्ट्र मार्गे गोव्याला पळुन जात असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळताच आरोपींना अटक करण्यात आली. गुरुवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान येथील कर्नाटक हद्दीतील कोगनोळी टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाचही आरोपींना कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
आरोपी महाराष्ट्रातुन गोव्याला जात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळताच नाकाबंदी लावण्यात आली. संशयीत आरोपी किणी टोलनाका पार करून पुढे आलेे. ते कोगनोळी टोल नाक्यावर येण्यापुर्वी वेगवान हालचाली करीत कागल पोलिस धडकले. आरोपींच्या वाहनास घेराव घालुन त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडुन प्रतिकार होण्याची शक्यता होती. त्यामुळे सावधपणा व धाडस दाखवीत कागल पोलिसांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !