शेख जावेद शेख याकुब यांना मौलाना अब्दुल कलाम आजाद पुरस्कार प्रदान
यावल : सर सय्यद एज्युकेशन सोसायटी साकळी संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू शाळा, यावल येथील शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांना कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मौलाना अब्दुल कलाम आजाद पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना मौलाना अब्दुल कलाम आजाद वाचनालय व ग्रंथालय कर्जोद, ता.रावेर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी अब्दुल मजीद जकेरीया होते. दीपप्रज्वलन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या तब्बल 30 लोकांना सन्मानीत करणयत आले. कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अब्दुल कलाम आजाद वाचनालय कर्जोदचे अध्यक्ष शेख शकील शेख अब्दुला यांच्या वतीने करण्यात आले.


