भुसावळात जुगार खेळताना एकास अटक


भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल नजीक सार्वजनिक ठिकाणी संशयीत आरोपी युनूस गुलाम शेख (60, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) हा कल्याण मटका जुगार खेळत असताना त्यास 9 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 740 रुपयांची रोकड व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भदाणे, नाईक किशोर महाजन, सुभान तडवी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, बापुराव बडगुजर, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !