कर्नाटक एक्स्प्रेसखाली आल्याने प्रवाशाचा मृत्यू


भुसावळ : 12628 अप कर्नाटक एक्स्प्रेसखाली आल्याने 55 ते 60 वर्षीय अनोळखी रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळील खांबा क्रमांक 327/38, 327/38 अ जवळ 8 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपूर्वी घडली. अनोळखी पुरूषाची उंची पाच फूट चार इंच, रंग निमगोरा, बांधा मध्यम, चेहरा गोल, दाडी व मिशी काळी पांढरी बारीक , अंगात फुल बाहीचा काळ्या बारीक लाईनिंगचा शर्ट व त्यावर फिक्कट गुलाबी रंगाचा फुलबाहीचा शर्ट असे वर्णन आहे. अनोळखी इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्यास वा त्यांच्या वारसांचा शोध लागल्यास चाळीसगाव लोहमार्गचे हवालदार संजय जंजाळ यांच्याशी (मो.9823102334) तसेच चाळीसगाव लोहमार्ग पोलिस ठाणे 9764093516 वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !