बोदवडमध्ये महाकाल फाउंडेशनतर्फे कावड मिरवणुकीने वेधले लक्ष


बोदवड : शहरातील महाकाल फाउंडेशनतर्फे व सर्व नागरीकांतर्फे सोमवारी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. शालिमार टॉकीजजवळ सकाळी नऊ वाजता महाकाल ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप मिलांदे यांच्या हस्ते कावडांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व महाकाल भक्त महादेवाच्या भव्य मूर्तीसह तजरीच्या कापडाने सजविलेल्या कावड यात्रेला सुरुवात झाली. 11 कळसांमध्ये तापी, पूर्णा यांचे जल भरण्यात आल्यानंतर 108 कावड घेत भाविक सहभागी झाले. यावेळी हर हर महादेव, ओम नमः शिवाय, बम बम भोलेचा गजर करण्यात आला.

यांचा कावड यात्रेत सहभाग
शालिमार टॉकीजपासून बसस्थानक. आंबेडकर चौक, बाहेर पेठ, गांधी चौक मार्गाने कावड यात्रा जामठी रोड वरील महादेवाच्या मंदिरावर पोहोचली. महादेवाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर विधीवत पूजा, स्वागत केल्यावर कळसातील जलाद्वारे विधीवत मंत्रोचारात शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. बोदवडवासीयांवर भोलेनाथाची कृपा व्हावी यासाठी साकडे घालण्यात आले. शहरातील व्यापारी संघटनेतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला. महाकाल ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप मिलांदे, उपाध्यक्ष रवी विल्हेकर, अतीश सारवान, अनिल गंगतिरे, संदीप मिलांदे, राजेश सारवान, रंजन पाटील, किरण सोनार, गजानन खोडके, राहुल बरडीया, योगेश बडगुजर, आकाश चोपडे, धनंजय सोनवणे, शैलेश खोडके, आनंद गंगतिरे व शहरातील युवा पिढी, नागरीक सहभागी झाले.


कॉपी करू नका.