मणियार बिरादरी संचालकपदी साबीर शेख व सलीम चुडीवाले


भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक हाजी साबीर शेख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीमसेठ चुडीवाले यांची मणियार बिरादरीत राज्यस्तरीय संचालक पदावर निवड करण्यात आली. मणियार बिरादरीच्या राज्य कार्यकारीणीत संचालकपदी माजी नगरसेवक हाजी साबीर शेख तर वित्तीय समितीच्या अध्यक्षपदी सलीमसेठ चुडीवाले यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या मण्यार बिरादरीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. या अधिवेशनात राज्यभरातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मण्यार बिरादरीसह मुस्लीम समाजात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व इतर कार्यांमध्ये सर्वांना मदत करण्याचे आश्वासन नुतन पदाधिकार्‍यांनी दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !