जळगावात दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू


भरधाव अ‍ॅटो दुचाकीवर धडकली : नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव : भरधाव अ‍ॅटो दुचाकीवर धडकून झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. महामार्गावर पोद्दार हायस्कूलजवळील मराठा मटन हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (31) व हेमंत चंद्रहास ललवाणी (34) अशी मृतांची नावे आहेत. महामार्गावरून बांभोरीकडून शहराकडे दुचाकीने येत असताा समोरून शहराकडून येणार्‍या एका भरधाव ऑटो रीक्षाने धडक दिल्याने हा अपघात झाला. मृत विवेक हा जळगावात एका खाजगी कंपनीत तर हेमंत हा बांभोरी येथे जैन पाईप कंपनीत नोकरीस असल्याचे समजते. विवेकच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व भाऊ-बहिण असा परीवार आहे. तर हेमंतच्या पश्चात आई व भाऊ असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !