वरणगाव शहरात बकरी ईद उत्साहात : ईदगाह मैदानावर वृक्षारोपण


वरणगाव : वरणगाव शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी नमाज पठण केले. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवाना गुलाबाचे फुल देवून वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, पोलीस उपनिरीक्षक बोरसे, उपनिरीक्षक कैलास आकुले, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, कामगार नेते मिलिंद मेढे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, मकसूदली सेठ, नगरसेवक ईरफान पिंजारी, नगरसेवक साजीद कुरेशी, माजी सभापती शेख खलील गनी, अजमल खान, युवा कार्यकर्ते काजी साहब, पप्पूसेठ जकातदार, भिकुसेठ वंजारी यांच्यासह असंख्य हिंदू बांधवउपस्थित होते. कार्यक्रमानंतर ईदगाह मैदानावर वरणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने नगराध्यक्ष सुनील काळे, पोलीस उपनिरीक्षक बोरसे, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.


कॉपी करू नका.