भुसावळातील दीनदयाल नगरातील अतिक्रमण हटवण्यास स्थगिती द्या


महामार्ग चौपदरीकरणात अतिरीक्त जागेचे संपादन झाल्याची नागरीकांची तक्रार

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात यापूर्वी मोजमाप होऊन निश्चित झालेल्या जागेपेक्षा अधिक जागा संपादीत केली जात असल्याने एप्रिल 2020 पर्यंत दिनदयाळनगरच्या 100 घरांचे अतिक्रमण काढण्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी दिनदयाळ नगरातील रहिवाशांनी मंगळवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे स्थळ पाहणीदरम्यान केली.

अधिक जागा संपादनाची तक्रार
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संबंधीत कंपनीचे अधिकारी मोजमाप पेक्षा अधिक जागा संपादीत करीत असल्याची तक्रार चंद्रकांत चौधरी व लोक संघर्ष मोर्चातर्फे शासकीय मोजणी झाल्याशिवाय अतिक्रमण काढू नये. कंपनीकडून खासगी सर्व्हेअरकडून मोजमाप करुन अतिरिक्त जागा घेतली जात आहे. यामुळे दिनदयाळ नगरातील पुनवर्सन झालेल्या नागरीकांचे पुन्हा विस्थापन करु नये, अशी मागणी करण्यात आली. यासह शहीद राकेश शिंदे चौकासह, नाहाटा कॉलेज पोलिस चौकी व नगरपालिका दवाखाना पाडण्यात आला आहे. यामुळे पुर्नउभारणी करून करून द्यावी, दीनदयाळ नगरातील पुर्नवसीतांसाठी कस्तुरबा गांधी नगराच्या जागेचे त्वरीत चौकशी व पूर्तता करून बेघर होणार्‍यांना मिरगव्हाण शिवारातील गट क्रमांक 95 मध्ये घरांसाठी जागा मिळावी तसेच अतिक्रमणधारकांच्या मुलांच्या परीक्षा होईपर्यंत म्हणजे एप्रिल 2020 पर्यत अतीक्रमण काढण्यास स्थगिती द्यावी, काम खोळंबू नये म्हणून महामार्गाचे काम दक्षिण कडील कॉलेजसाईडकडून सुरु ठेवावे, अशी मागणीदेखील लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने चंद्रकांत चौधरी यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !