अवैध गौण खनिज वाहतूक : दोन वाहने प्रांतांनी केली जप्त


फैजपूर : रावेर-फैजपूर रस्त्यावर अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या दोन वाहनांवर कारवाई करत दोन्ही वाहने पोलिस स्टेशनला जमा करण्यात आली. फैजपूर-रावेर रस्त्यावर अवैधरीत्या गौण खनिजाचे वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी आठ वाजता कारवाई करत संजय सपकाळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.वाय.4648) मध्ये तीन ब्रास मुरूमाची वाहतूक करताना आढळले तसेच सकाळी 10 वाजता तालुक्यातील अंजाळे येथील सुभाष महारु सपकाळे यांच्या मालकीचे डंपर (एम.एच.19 झेड.5294) मध्ये तीन ब्रास माती आढळून आली या प्रकरणी दोन्ही वाहने प्रांतधिकार्‍यांच्या पथकाने कारवाई करत पोलिस स्थानकात जमा करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक व अवैध गौण खनिज चालकांचे धाबे दणाणले आहे.

मध्यरात्रीच चाले वाळू वाहतुकीचा खेळ
फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दोन वर्षांपासून अवैध वाळू वाहतूक व अवैध गौणखनिज धारकांना पळवून सोडले आहे. त्यांच्या कारवाईमुळे सामान्य नागरीक समाधानी आहे. आधी दिवसा ढवळ्या सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक आता मध्यरात्री 12 नंतर चालत आहे. मध्यरात्री सुरू असणारी अवैध वाहतूकवरही कारवाई व्हावी ही मागणी नागरिक करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !