व्यावसायीकतेकडे सकारात्मकतेने बघून वधूंनी निवड करावी
डॉ.दीपक रावेरकर : रावेरात चितोडे वाणी समाज वधू-वर परीचय मेळावा
रावेर : वर नोकरदार असावा, असा अट्टहास सर्वांचा दिसतो पण यामुळे अनेक प्रश्न आज समाजात निर्माण होतांना दिसत आहेत. मुलींनी आपला वर निवडतांना व्यावसायीक असणार्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, आपला मूळ व्यवसाय व्यापारच आहे, असे मत रावेर येथे आयोजित चितोडे वाणी समाज वधू वर परीचय मेळाव्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ.दीपक रावेरकर यांनी व्यक्त केले. रावेर शहरात चितोडे वाणी समाज वधू वर परीचय मेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाही ग्रुप संचालक राजेश यावलकर, माजी नगराध्यक्ष डॉ.अनंत नारायण अकोले. माजी नगराध्यक्ष अशोक गणपत वाणी. विद्यमान नगरसेवक संगीता शिरीष वाणी, माजी नगरसेवक शिरीष जगन्नाथ वाणी, नगरसेवक यशवंत वासुदेव वाणी, वामनराव जगन्नाथ वाणी, कैलास राजाराम वाणी, दिनकर दशरथ पाटील, डॉ.दत्तप्रसाद दलाल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक महेश अत्रे यांनी केले. मनोगत व्यक्त करतांना राजेश यावलकर यांनी म्हटले की, पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण केवळ शासकीय नोकरी मिळविण्यासाठी न देता त्याला उत्कृष्ट व्यावसायीक आणि सुजाण नागरीक बनविण्यासाठी द्यावे आपल्या मुलीसाठी केवळ नोकरदार मुलगा न शोधता उत्कृष्ट व्यावसायीक किंवा शेतकरीदेखील शोधला पाहिजे कारण आपला मूळ व्यवसाय हा व्यापारच आहे. सूत्रसंचालन गिरीश पाटील यांनी केले.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी वधू-वर परीचय मेळावा समिती अध्यक्ष महेश सुरेश अत्रे, निलेश भास्कर पाटील, उदयकांत दत्तात्रय वाणी, गिरीष रत्नाकर पाटील, पंकज भास्कर खारूळ प्रमोद गणपती गजेश्वर, दिलीप नारायण वाणी, प्रशांत पंढरीनाथ श्रावक, सुनील गोविंद वाणी, वैभव दिनानाथ कौशिक, सुनील वामनराव वाणी, अमोल प्रभाकर पाटील, किरण सोमनाथ वाणी, गिरधर शंकर गजेश्वर, प्रशांत त्र्यंबक वाणी यांच्यासह पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले.


