भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले : पाळधीतील दुचाकीस्वार जागीच ठार
A Speeding Four-Wheeler Blew up a two-wheeler : The Two-Wheeler Rider In Paladhi Was Killed On The Spot धरणगाव : भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवल्याने पाळधीतील 40 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी असलेले संजय ढोमण सपकाळे (40) हे शनिवार, 15 रोजी दुपारी जळगावकडून पाळधी येथे दुचाकी (क्र. एम.एच.19.सी.एच.4726) ने जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सूर्याजवळ मागून येणार्या चारचाकी (क्र.एम.एच.20.एफ.यु.6453) ने धडक दिल्याने संजय सपकाळे यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुरुवार, 20 रोजी सनी संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चारचाकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत.
