म्हसासच्या तरुणाला ऑनलाईन ट्रेडींगदरम्यान भामट्याने 85 हजारात फसवले
Mhasas youth was cheated by Bhamta of 85 thousand during online trading पाचोरा : ऑनलाईन ट्रेंडींग करताना पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील 27 वर्षीय तरुणाला भामट्याने 85 हजार 500 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एका मोबाईल नंबर धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे न करता केली फसवणूक
पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील 27 वर्षीय तरुण शुभम रवींद्र पाटील हा ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रेडिंग करीत असताना त्याने युपीआयद्वारे 85 हजार 500 रुपये 9907408135 या मोबाईल धारकाला टाकले परंतु त्याने परत देण्यास नकार दिल्याने तरुणाची फसवणूक झाली. या प्रकरणी पिंपळगाव हरे.पोलिसात तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक शैलेश चव्हाण करीत आहेत.
