लग्नानंतर नवरी लाखाचे दागिणे घेवून पसार : चोपडा पोलिसात दलालांसह पाच जणांविरोधात गुन्हा
In the name of marriage, a young man was cheated of three lakhs in Chopda taluka : a crime against five people! चोपडा : चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणाची लग्नाच्या आमिषाने दलाल महिलांनी फसवणूक केली तसेच लग्नानंतर नवरी एक लाखांचे दागिने घेवून रफूचक्कर झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नववधूसह दोन दलाल महिला व अन्य तिघांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्या आमिषाने गंडा घालणारे रॅकेट सक्रिय
चोपडा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या दीपक भुरेसिंग बारेला (39) या तरुणाच्या लग्नासाठी दोन महिला व तीन पुरूषांनी संपर्क साधल्यानंतर दलाल दाम्पत्याला सुरूवातीला 50 हजार व नंतर एक लाख 40 हजार बँक खात्यावर घेतले तसेच नवरीला एक लाखांचे दागिने व कपडे खरेदीसाठी देण्यात आले. नाशिकच्या पंचवटीत लग्नासाठी खोटे कागदपत्र बनवून विवाह पार पाडण्यात आला मात्र लग्नानंतर लागलीच घरच्यांची नजर चुकवून नवरी कपडे व दागिण्यांसह रफूचक्कर झाल्याने तरुणाने चोपडा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
तरुणाच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी तथा दलाल महिराधा रामधन परदेशी (42), रामधन मोहन परदेशी (45, दोन्ही रा.घर नंबर 208, वरवंदी रोड, नाशिक), नवरी व आरोपी कविता कृष्णा कडाळी (पोसार मोखाडा जव्हार), कविताचा भाऊ अमित कातकरी (मोखाडा जव्हार), कैलास अशोक पाटील (45, सपन पान सेंटर, उधना, सुरत, गुजरात) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र सोनवणे हे करीत आहेत.