Daring house burglary in Sukli : 60 thousand instead of loot सुकळी येथे धाडसी घरफोडी : 60 हजारांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Sukli : 60 thousand instead of loot मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी येथे बंद घरातून चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना 22 रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
विजय देविदास पाटील (42, सुकळी, ता.मुक्ताईनगर) यांच्या सुकळी येथील बंद घरातून 43 हजार 500 रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, टाटा स्काय रीसीव्हर, पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, आठ हजारांची रोकड तसेच चार हजार रुपये किंमतीचा मोबाईल मिळून एकूण 60 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विकास नायसे करीत आहेत.
