मंगरूळ शिवारातून 11 हजारांची कॉपर वायर लांबवली : आरोपीला अटक
11,000 copper wire extended from Mangrul Shivar : Accused Arrested रावेर : तालुक्यातील मंगरूळ शिवारातून चोरट्यांनी 11 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लंपास करताना चोरट्याला अटक करण्यात आली. बुधवार, 19 रोजी ही घटना घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (21, पिंप्री, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतातून लांबवली कॉपर वायर
शेतकरी विजय नारायण पाटील (51, केर्हाळा बु.॥) यांची मंगरूळ शिवारात शेत गट क्रमांक 269 मध्ये शेती आहे. संशयीत जमील तडवी याने शेतातील इलेक्ट्रीक पंप एकूण 11 हजार रुपये किंमतीची कॉपर वायर लांबवली. या प्रकरणी शेतकरी पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास नाईक सुनील वंजारी सानप करीत आहेत.
