Midnight armed robbery in Nandurshingote : Lakhs of money were stolen by beating नांदूरशिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा : मारहाण करीत लाखोंचा ऐवज ओरबाडला


Midnight armed robbery in Nandurshingote : Lakhs of money were stolen by beating नांदूरशिंगोटे : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकत सोन्यासह लाखोंचा ऐवज लुटण्यात आला. ही घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे रविवारी मध्यरात्री घडली. कुटुंबांना सात ते आठ दरोडेखोरांनी चाकू, कुर्‍हाडीचा व लाठ्या-काठ्यांचा धाक दाखवला तसेच मारहाण केल्याने दोन महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले. दरोडेखोरांनी पाच घरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन बंगल्यात त्यांनी धाडसी घरफोडी केली.

25 मिनिटे बंगल्यात धुमाकूळ
नांदुरशिंगोटे येथील जुन्या चासरोड लगत बांधकाम व्यावसायीक संतोष गंगाधर कांगणे यांचा कैलास स्मृती नावाचा बंगला आहेत. सदरच्या बंगल्यला दरोडेखोरांनी टार्गेट करत दहा ते बारा तोळे सोने तसेच पावणेतीन लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लांबविली. दरोडेखोरांनी वीस ते पंचवीस मिनिटे कांगणे यांच्या घरात धुमाकूळ घालत चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी चाकू व हत्याराचा धाक दाखविल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता घरातील ऐवज चोरुन नेला. घरातील लहान मुलांनाही लक्ष केले.

मारहाण करीत ऐवज ओरबाडला
त्यानंतर दरोडेखोरांनी नाशिक-पुणे हायवे लगत अवघ्या एक हजार फुटावर अंतरावर असलेल्या वाळके वस्तीवरील बंगल्याला लक्ष केले. रमेश लक्ष्मण शेळके यांनी नुकताच दोन दिवसांपूर्वी नवीन बंगल्यात प्रवेश करुन राहण्यासाठी आले होते. दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत शेळके यांच्या मातोश्री इंदुबाई लक्ष्मण शेळके यांना धमकावत कानातील सोन्याचे काप ओरबाडून नेले तसेच त्यांना मारहाण केली तसेच शेळके यांच्या बेडरुमचा दरवाजा बंद करुन घेतला. मात्र त्यांची मुलगी आरोषी हिने दरवाजा उघडल्याने बाहेर येताच त्यांच्यात झटापट झाली.

मारहाणीत दोघे जखमी
सहा ते सात दरोडेखोरांचा शेळके परीवाराने प्रतिकार केल्याने दोघे जखमी झाले. दरम्यान पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !