स्वरचैतन्याने बहरली दिवाळी पहाट  : सुरेल भावगितांनी श्रोते मंत्रमुग्ध

मातृभुमी प्रतिष्ठान, विकास कॉलनीतील साई चौक मंडळातर्फे आयोजन 


भुसावळ : शहरातील जय मातृभुमी प्रतिष्ठानने मातृभुमी चौकात तर विकास कॉलनीतील साई चौक मित्र मंडळाने सोमवारी दिवाळीनिमित्ताने पहाटे सुरेल भावगितांचा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भावगितांसह मराठी हिंदीतील सुरेल गितांनी स्वरचैतन्य निर्माण करुन भुसावळकरांच्या श्रोत्यांची दिवाळी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
विकास कॉलनी साई चौक
सूर निरागस हो नमन गणेशा, प्रभाती सूर नभी रंगती, उठी उठी गोपाळा, उठी श्रीरामा, घन:श्याम सुंदरा अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण भुसावळ येथील विकास कॉलनीतील साई चौकात पार पडलेल्या तेजोमय नादब्रह्म कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेमूर्तीला योगगुरू महानंदा पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी बी.एल. पाटील, प्राचार्य जयश्री भंगाळे, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, आर.एल. पवार, सामाजिक कार्यकर्ते रूपेश देशमुख, डाॅ.छाया फालक (देशमुख), लखन देशमुख, संजयसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख गायक व निवेदक किरण सोहळे यांच्यासह गायक वरूण नेवे, गायक कु.भाग्यश्री भंगाळे, हार्मोनियम वादक गणेश देसले, व तबला वादक सुयोग गुरव यांनी साथसंगत केली.
मातृभुमी प्रतिष्ठान 
मातृभुमी प्रतिष्ठानतर्फे आयोजीत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार संजय सावकारे, उद्योजक मनोज बियाणी, प्रा. सुनील नेवे आदींच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते, शालिनी भागवत कोलते, दीपक धांडे, पुरुषोत्तम नारखेडे,  नितीन नंदवणे आदींची उपस्थिती होते. विठू माऊली तू माऊली जगाची, प्रभाती सुर रंगले आदींसह विविध भावगितांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमात गायिका सुरभी गौड, अनिल भालेराव, कृणाल वाकोडे, जय सोनवणे, ज्योती राणे, दिनेश ठाकूर यांनी गायन केले. जय मातृभुमी प्रतिष्ठानचे तेजस झांबरे, पिंटू बऱ्हाटे, मानव वारके, गोलू वारके, सचिन बऱ्हाटे आदींसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !