क्षुल्लक वादातून बोरखेड्यात एकास मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


A Person was beaten up in Borkheda due to a petty dispute : A Crime Against Four धरणगाव : प्लॉटमध्ये जाण्यास रस्ता न दिल्याच्या रागातून एकाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची तालुक्यातील बोरखेडा येथे घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
सोमवार, 24 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वप्नील गोरख पाटील (वय 23) यांचे वडील गोरख पाटील यांना त्यांच्याच प्लॉटमध्ये जाण्यास रस्ता न दिल्याने त्यांनी याची विचारणा केली. याचा राग आल्याने संशयीत वसंत जयराम पाटील, समाधान वसंत पाटील, राहुल वसंत पाटील, बेबाबाई वसंत पाटील यांनी काठीने मारहाण केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोती पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !