Daring burglary in Jalgaon : One lakh 62 thousand compensation extended विवेकानंद नगरातील बंद घर फोडले : पावणे दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला
Daring burglary in Jalgaon : One lakh 62 thousand compensation extended जळगाव : दिवाळीनिमित्त कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर चोरटे संधी सोने करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. जळगावातील विवेकानंद नगरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाख 62 हजारांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ही चोरी मंगळवार, 25 रोजी उघड झाली. याबाबत रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
“भुसावळात माफक किंमतीत घर हवे आहे मग हा व्हिडिओ नक्की पाहायलाच हवा !”

बंद घर चोरट्यांना पर्वणी
जळगावच्या विवेकानंद नगरात निलेश शेखर वारके (40) हे त्यांच्या परीवारासह वास्तव्यास असून ते गावाला गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. शनिवार, 22 रोजीच्या सायंकाळी पासून ते 25 च्या सकाळपर्यंत कुणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून 50 हजारांचे मंगळसूत्र, 12 हजार 500 रुपयांचे कानातील दागिने, 40 हजारांची रोकड, तोरड्या व शिक्के मिळून एक लाख 62 हजारांचा ऐवज लांबवला. वारके यांनी रामानंद पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.