शेकडो वर्षांची परंपरा कायम : जळगावात दिवाळी पाडव्याला सगर पूजन


In Jalgaon, the tradition of the Sagar Utsav of Diwali Padwa continues by the Gawli community जळगाव : संगणक व इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा (रेडा, म्हशी पूजन) सगर पूजनाची परंपरा कायम आहे. महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. त्यानंतर सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) सुरुवात झाल्याचे जुने जाणकार सांगतात.

जळगावात वर्षानुवर्षे जपली जातेय परंपरा
पारंपरीक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाजबांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदेनिमित्त सगर उत्सव साजरा करतात. आगामी काळात व येणार्‍या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटीत संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणी यम राजाचे वाहन रेड्याचे दवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते. वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाजबांधव एकत्र जमतात. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते. जळगाव शहरात मोहाडी रोड परीसर तसेच शिरसोली गवळी वाडा परीसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला.

यांची उत्सवास उपस्थिती
यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसे, सह सचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर, विशाल बारसे, जेष्ठ पंच भागवत आप्पा बारसे, साहेबराव बारसे आदी समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !