भरधाव खाजगी बसच्या धडकेने पादचारी ठार : धरणगाव-चोपडा रस्त्यावर अपघात


Pedestrian killed after being hit by a speeding private bus: Accident on Dharangaon-Chopra road धरणगाव : भरधाव वेगातील खाजगी बसच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाला. हा अपघात धरणगाव-चोपडा रस्त्यावर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव बसच्या धडकेने पादचारी जागीच
धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर सोमवार, 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाळू पांडूरंग साळुखे (34) हे साळवा फाट्याकडे पायी येत असतांना चोपड्याकडे जाणार्‍या भरधाव खाजगी बस (क्र. एम.एच.46.जे.0765) वरील चालक एकनाथ पंडित सैदाणे (रा.चोपडा) याने ओव्हरटेक करीत असतांना साळुखे यांना जबर धडक देत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी एकनाथ सैंदाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार सैय्यद करीम करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !