भरधाव दुचाकीने उडवल्याने कुर्‍हाकाकोडा गावातील बालक जखमी


A boy from Kurhakakoda village was injured after being run over by a speeding bike मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा येथे फटाके फोडत असलेल्या बालकाला भरधाव दुचाकीने उडवल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

फटाके फोडताना दुचाकीची धडक
तक्रारदार रवींद्र ओमप्रकाश डालमिया (48) यांचा मुलगा सर्वश रवींद्र डालमिया (11) हा गल्लीत सोमवारी रात्री फटाके फोडत असताना संशयीत आरोपी अभिषेक भगवान इंगळे (कुर्‍हा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.19 बी.एल.6558) भरधाव वेगाने चालवत सर्वशला धडक दिल्याने त्याच्या हाता-पायाला मोठी दुखापत झाली आहे. तपास नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !