भुसावळात 23 तर रावेरात 13 खटल्यांमध्ये लोकअदालतीत तडजोड
भुसावळ : अतिरीक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात दिवाणी व फौजदारी अशा एकूण 851 केसेस ठेवण्यात आल्या. त्यापैकी 23 खटल्यात आपसात तडजोड होवून 32 लाख 47 हजार 145 रुपयांची वसुली करण्यात आली तर वसुलीचे दावा दाखलपूर्वच्या तीन हजार 42 केसेस न्यायालयात ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आठ निकाली निघून 20 लाख 73 हजार 801 रुपयांची वसुली झाली. एकुण 31 खटल्यात 53 लाख 20 हजार 946 रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्या.एस.पी.डोरले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. लोक अदालतीसाठी एकूण तीन पॅनल ठेवण्यात आले होते. पॅनल क्रमांक एकवर जिल्हा न्या.आर.आर.भागवत, पंच सदस्य नेहा खैरनार, पॅनल क्रमांक दोन वर दिवाणी न्या.एम.पी.विहारे, पंच सदस्य स्वाती कापडे, पॅनल तीनवर चौथे सह दिवाणी न्या.आर.एस.मानकर, पंच सदस्य निधी महाजन यांची उपस्थिती होती. लोक अदालतीसाठी कर्मचारी डी.आर.पाटील, एस.आर.पाटील, जगदीश मानकर, बारुदत्त देशमुख, राजु ठाकूर, दीपक वाघ व आदींनी सहकार्य केले.
रावेरात 13 प्रकरणात तडजोड
रावेर- रावेर तालुका विधी सेवा समितीतर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित व दाखल-पूर्व प्रकरणांसाठी राष्ट्रीय-लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्या.आर.एल.राठोड यांनी दीपप्रज्वलन केले. प्रमुख अतिथी म्हणून न्या.आर.एम.लोळगे, प्रभारी गट विकास अधिकारी तडवी, सरकारी अभियोक्ता प्रवीण वारुळे, तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.विनोद कोंगे, उपाध्यक्ष अॅड.जे.एम.महाजन, सचिव अॅड.बी.डी.निळे, अॅड.आर.एन.चैधरी, अॅड.व्ही.पी.महाजन, अॅड.सी.जी.पाटील, अॅड.जे.जी.पाटील, अॅड.मुजाहिद शेख, अॅड.विपीन गडे, अॅड.डी.ई.पाटील, अॅड.प्रवीण पाचपोहे यांच्यासह वकिल उपस्थित होते.

13 प्रकरणात समेटाने तडजोड
रावेर न्यायालयात एकूण 224 प्रलंबित प्रकरणे आपसात समेटाने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली मात्र केवळ 13 प्रकरणांमध्ये आपसी समेटाने मिटवण्यात आली तसेच 10 हजार 815 प्रकरणे ग्रामपंचायत, नगरपालिका, बीएसएनएल, श्रीराम फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ बडोदा इत्यादी बँकेची वसुलीची प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 551 विवाद पूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यात आलीत. यात एकूण रक्कम रुपये 27 हजार 81 हजार 637 मात्र वसुल करण्यात आले.


