मानवाधिकार संघटना बोदवड तालुका अध्यक्षपदी संजय शुरपाटणे


उपाध्यक्षपदी रवींद्र मराठे : नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

बोदवड : केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हा शाखे अंतर्गत बोदवड तालुका कार्यकारीणी नुकतीच निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी संजय शुरपाटणे तर उपाध्यक्षपदी जनशक्तीचे बोदवड तालुका प्रतिनिधी रवींद्र नारायण मराठे यांची निवड करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, सचिव राजेश पोतदार, जिल्हा संघटन सचिव प्रा.बी.जी.माळी, पुरूषोत्तम गड्डम, डॉ.सुरेश वराडे घोगले साहेब उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा संघटन सचिव बी.जी.माळी यांनी केले.

तालुका कार्यकारीणी जाहीर
अध्यक्ष संजय शुरपाटणे, उपाध्यक्ष रवींद्र मराठे (पत्रकार), सचिव डॉ.सुरेश वराडे, कार्याध्यक्ष विजय माळी, निलेश पाटील, कोषाध्यक्ष सुभाष शुरपाटणे, सहसचिव नईम खान, हर्षल बडगुजर, संघटक सचिव शांताराम कोळी, बी.डी.इंगळे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.ईश्वर पाटील, अ‍ॅड.अर्जुन पाटील, प्रसिद्धी प्रमुख संदीप वैष्णव, अमोल अमोदकर, गोपीचंद सुरवाडे, सदस्य रामचंद्र बजोळे, सुधाकर तायडे, महासेन सुरडकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा शिवचरण उज्जैनकर, राजेश पोतदार, प्रा.बी.जी.माळी व पुरूषोत्तम गड्डम यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !