रावेरात अवघ्या 15 मिनिटात आटोपला लोकशाही दिन


एकही तक्रार नाहीः प्रतिनिधिंना पाठवुन विभाग प्रमुखांच्या दांड्या

रावेर : रावेर तहसील कार्यालयात आयोजित लोकशाही दिन अवघ्या पंधरा मिनिटात आटोपण्यात आला. इतर विभागाच्या प्रमुखांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तहसील कार्यालयात लोकशाही दिन कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागांच्या कार्यालय प्रमुखांना सूचना दिल्या होत्या मात्र या दिनाच्या आयोजित कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी, सावदा-रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा परीषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, रावेर व सावदा येथील दुय्यम निबंधक, पाल व रावेर येथील वनविभागाचे अधिकारी तसेच निंभोरा व सावदा येथील पोलिस ठाण्याच्या अधिकारी उपस्थित राहिले नाहीत तर काही विभागाच्या अधिकारी अधिकार्‍यांनी स्वतः उपस्थित न राहता प्रतिनिधी पाठवून या लोकशाही दिनाची बोळवण केली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र स्वतः उपस्थित राहिले,

असे आहे लोकशाही दिनाचे महत्व
नागरीकांना सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे तसेच आपल्या तक्रारी समस्या सोडता यावीत म्हणून शासनाने महिन्याच्या सोमवारी तालुका, जिल्हा, विभागीय तसेच मंत्रालयात असे ठरवून दिलेले दिन आहेत. यामध्ये सर्व विभाग प्रमुख स्व:त उपस्थित राहणे बंधनकारक आहे परंतु जबाबदार अधिकारी या लोकशाही दिनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. अनेक महिन्यांपासून या लोकशाही दिनाकडे दुर्लक्ष झाल्याने लोकांपर्यंत याचे महत्व पोहचले नाही म्हणून पहिल्याच लोकशाही दिन तक्रारीविनाच झाला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !