दोन गुन्हे दाखल होताच आमदार जितेंद्र आव्हाड संतप्त : आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा
MLA Jitendra Awad angry as soon as two cases were registered : announcement to resign from MLA मुंबई : 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून भाजप महिला पदाधिकार्याने याप्रकरणी मुंब्रा पोलिसांकडे तक्रार केली आहे.
ट्विट करीत राजीनाम्याची घोषणा
ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले असून तेही कलम 354 चे त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.


विनयभंगाचा गुन्हा दाखल
ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री आव्हाडांविरोधात भाजप महिला पदाधिकार्याने विनयभंगाची तक्रार दाखल करताच पोलिसांनी रात्री उशिरा आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मुंब्रा येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यातच ही घटना घडल्याचे भाजप महिला पदाधिकार्याने म्हटले आहे.
गुन्हा दाखल होताच आव्हाड संतप्त
मुंब्रा पोलिस ठाण्यात महिला पदाधिकार्यानी धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केल्यानंतर आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांनी 72 तासांत पोलिसांनी माझ्याविरोधात दोन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकशाहीची हत्या बघू शकत नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली.