मुंबई-नागपूर दरम्यान विशेष गाड्या धावणार


भुसावळ : आगामी नाताळ सणानिमित्त मुंबई-नागपूर-मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्रमांक 02035 डाऊन मुंबई-नागपूर विशेष गाडी मुंबई येथून शनिवार, 21 डिसेंबर रोजी 12.20 वाजता सुटून त्याच दिवशी नागपूरला 3.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 02036 अप नागपूर-मुंबई विशेष रेल्वे रविवार, 22 डिसेंबर रोजी 3.30 वाजता नागपूरहून सुटेल व दुसर्‍या दिवशी 6.15 वाजता मुंबईला पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, 14 शयनयान व चार सामान्य द्वितीय श्रेणी डबे जोडण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !